सोलापूर येथील सामाजिक आणि राजकीय चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते नजाकत अली मंदृपकर यांची महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी च्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले…
“बागबान न्यूज” तसेच बागवान जमियत चॅरिटेबल ट्रस्ट,सोलापूर च्या माध्यमातून जिल्ह्यातील सबंध ओबीसी चळवळी मध्ये महत्वाची भुमिका पार पाडणारे नजाकत अली मंदृपकर हे नित्य नियमाने चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातुन सोलापूर येथे दरवर्षी वधू वर मेळावा आयोजित करून अनेक सामाजिक प्रश्न हाताळत असतात…
नजाकत अली मंदृपकर हे सोलापूर शहर जिल्हा बागवान जमात,महाराष्ट्र राज्य या संस्थे वर सल्लागार म्हणून हि कार्यरत असुन त्यांच्या याच कार्याची दखल घेत डॉ शरीफ बागवान यांनी त्यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली…
नजाकत अली मंदृपकर हे थोर “स्वातंत्र्य सेनानी” चांदसाब मंदृपकर यांचे सुपुत्र असुन घरातूनच मिळालेला समाज सेवेचा वसा ते सर्वदूर पसरवत आहेत…
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी पार पाडणारे नजाकत अली मंदृपकर यांची महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी च्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे भ्रमण ध्वनी वरून बोलताना सारथी महाराष्ट्राचा न्यूज चे आमीर मोहोळकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या…


Discussion about this post