भोकर – राजकुमार पांचाळ
हदगाव तालुक्यातील रहिवासी असलेली भोकर शहरात शिक्षण घेत असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी मिळून बळजबरीने सामूहिक अत्याचार केला. तालुक्यात मागील महिन्यातील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच दि. १७ ऑक्टोबर रोजी तालुक्यात घडलेली ही घटना मागील चाळीस दिवसांतील अत्याचाराची चौथी घटना आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध दिनांक १८ ऑक्टोबर रोजी भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील एका ८ वर्षीय बालिकेस खाऊचे आम्हीच दाखवून या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. १४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील पाळज येथे प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी मिळून अत्याचार केला. तर ४ ऑक्टोबर रोजी शहरातील बायपास रोड वरील डोंगरी टी पॉइंट जवळ एका प्रवासी महिलेवर दोघांनी मिळून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
चाळीस दिवसांतील या अत्याचाराच्या तीन घटना ताज्या असतानाच चौथी घटना हदगाव तालुक्यातील एका तांड्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी भोकर शहरातील एका शाळेमध्ये दहावी वर्गात शिक्षण घेते. दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे भोकर शहरातील एका शाळेकडे ती एकटीच जात असल्याचे पाहून हदगाव तालुक्यातील ज्या टाटा मॅजिक गाडी चालक सुदर्शन राजू जंगेवाड व याचा मित्र निखिल माधव चंदापुरे या दोघांनी तिला गुड्डा महादेव परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुदखेड रोडवरील टेकडीवर नेऊन निखिल माधव चंदापुरे याने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देऊन तिच्या शाळेजवळ नेऊन सोडले. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून सुदर्शन राजू जंगेवाड व निखिल माधव चंदापुरे या दोघांविरु पोक्सो अंतर्गत भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड ह्या अधिक तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी २४ तासाच्या आत दोन्ही आरोपींना गजाआड केले. त्यांना १८ रोजी भोकर न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Discussion about this post