प्रतिनिधी राजकुमार पांचाळ
तालुक्यातील पाळज येथील आदिराज बार अँड रेस्टॉरंट, चे मालक गंगाधर नारायण उपुवार ,आई चंद्राबाई उपुवार, वहिनी, लक्ष्मीबाई साईनाथ उपुवार, पुतणी प्रीती साईनाथ उपुवार, बहिण, अंकिता अनिल चटलावार, मेहुना अनिल विठ्ठलराव चटलावार, चुलत भाऊ महेश बापूराव उपुवार, यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार भोकर पोलिसात
भारतीय न्याय संहिता कलम,85,115(2),352,351(2),351(3),3(5)
नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी गंगाधर नारायण उपुवार व त्याची आई, वहिनी, पुतणी,बहिण , मेहुना, व चुलत भाऊ यांनी संगणमत करून शारीरिक मानसिक त्रास देत, अत्यंत हीन दर्जाची वागणूक देत, पैशाची मागणी करत, मारहाण करून घरा बाहेर हाकल्याची तक्रार दिली आहे. दिनांक 12 मे 2020 रोजी अश्विनी पि.आनंद आणेबोईनवाड, तिचे लग्न धार्मिक रिती रिवाजा प्रमाणे पाहुण्या राऊळ्याच्या साक्षीने मौजे नांदा मैसा पट्टी येथे पाच लक्ष रुपये स्त्रीधन, चार तोळे सोने, एक लक्ष रुपयाचे संसार उपयोगी साहित्य, देऊन कोविड काळामध्ये लग्न लावून देण्यात आले.
आठ ते दहा महिने संसार सुखाचा झाला. आणि पुढे अश्विनीचा छळ सुरू झाला. अश्विनीच्या सासरची मंडळी श्रीमंत असल्यामुळे अश्विनीचे वडील हे त्यांच्या नजरेत गरीब होते. अश्विनीच्या सासूच्या नावे मौजे पाळज येथे देशी दारूचे दुकान आहे. पतीच्या नावे आदिराज बार अँड रेस्टॉरंट नावाने हॉटेल आहे.घरी भरपूर शेती, पाहुणे श्रीमंत असल्यामुळे अश्विनी चे वडील आनंद आणेबोईनवाड यांनी, आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल, या उद्देशाने दुसर पर्ण्या, अर्थात पहिले लग्न झालेल्या . पहिली पत्नी वारलेली, एक मुलगी असलेल्या, मुलास आपली मुलापेक्षा खूप वय कमी असलेली मुलगी दिली आणि लग्न लावून दिले. लग्नानंतर एक वर्षाच्या आतच मुलीच्या संसाराचा खेळ खंडोबा व्हायला सुरुवात झाली. यामुळे अश्विनी चे वडील बेचैन झाले. नवीन व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी अश्विनीला तगादा लावण्यात आला. तुझ्या वडिलांनी आमच्या हैसीयती प्रमाणे हुंडा दिला नाही. तू दिसायला सुंदर नाहीस, अशा प्रकारचे टोमणे मारत घरच्या मंडळींनी अधून मधून मारहाण करायला सुरुवात केली. आज ना उद्या संसार सुखाचा होईल, म्हणून अश्विनीने हे सर्व गपगुमान सहन करण्याचा प्रयत्न केला.
अचानक तब्येत खराब झाल्याने माहेरी आलेल्या अश्विनीला घरची मंडळी न्यायला आलीच नाही. तिने अनेक वेळा आपल्या पतीला फोन केला, नेण्यासाठी कोणीच येत नसल्याने ती स्वतः सासरी पाळज येथे आपल्या घरी गेली. असता पुतणी प्रीती, जाऊ लक्ष्मीबाई, सासू चंद्राबाई, यांनी घरी जाताच घरात न घेता शिवीगाळ करून घराबाहेर हाकलून दिले नाईलाजाने माहेरी परत आलेली बिमार पडल्याने वडिलांनी नांदेड येथे दवाखान्यात नेले असता ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने अश्विनीला थोडा धीर आला मला मूल बाळ झाल्याने माझा संसार सुखी होईल या आशेने अश्विनीने सासरी कळवले परंतु याबाबत कुणालाही खुशी झाली नाही किंवा कोणीही आले नाही. अश्विनी च्या वडिलांनी याबाबत पाहुणे,रावळे, ज्येष्ठ लोकांना,घेऊन मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु सासरचे मंडळी अश्विनीला नेण्यास तयार झाले नाहीत. अश्विनीला मुलगी झाली. वाट पाहून तीन ते चार वर्षाचा काळ लोटला सासरकडील कोणी विचारायला तयार नाही. म्हणून अश्विनीने महिला दक्षता समिती भोकर येथे धाव घेतली, तेथेही पत्र व्यवहार करून अश्विनीच्या सासर कडील मंडळी यायला व न्यायला तयार नसल्याने, भोकर पोलिसात धाव घेत घडलेल्या सर्व बाबींचे कथन केल्याने भोकर पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा भारतीय न्याय संहिता नुसार सासरच्या मंडळी विरुद्ध दिनांक 16/10/2024 रोजी गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक, अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का.नामदेव कोटु जाधव करीत असून, माय लेकींना न्याय कधी मिळणार, याकडे तिचे लक्ष आहे.


Discussion about this post