—————
मुलांमधून वाटेफळ शाळेने तर मुलींमधून कार्ला शाळेने मिळवला प्रथम क्रमांक————–
परंडा तालुका प्रतिनिधी:-
कृतीतून शिक्षण देणारी आपली शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिक असणारी जिल्हा परिषद पवारनगर शाळा ही नेहमीच विद्यार्थी हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवीत असते . गेल्या तीन वर्षापासून पवारनगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी तालुकास्तरीय लंगडी स्पर्धाचे आयोजन केले जात आहे . शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेमध्ये तालुक्यातील मुला -मुलींचे एकूण तेवीस संघ सहभागी झाले होते.
तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन:-
स्पर्धेचे उद्घाटण आंबी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक गोरक्ष खरड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय बोधले , केंद्रप्रमुख सचिन केमदारणे, केंद्रीय मुख्याध्यापक मुबारक पठाण, इनगोदा गावचे प्रथम नागरीक अमोल (भैय्या) जगताप – पाटील, शिक्षणप्रेमी नागरीक बाबुराव (आबा) गायकवाड, नामदेव (आबा) पवार आदि मान्यवरांच्या हस्ते झाले.
लंगडी स्पर्धेचे आयोजन:-
लंगडी स्पर्धेचे आयोजक तसेच उपक्रम शिक्षक विनोद सुरवसे हे ठाणे जिल्हा परिषद येथे बारा वर्ष कार्यरत होते.तेथे दरवर्षी
चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या लंगडीच्या स्पर्धा राज्यस्तरापर्यंत होत होत्या.धाराशिव जिल्हयात काम करत असताना चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मैदानी स्पर्धा होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर या लहान गटातील विद्यार्थ्यांनाही मैदानी सांघिक खेळ खेळता यावेत . त्यांनाही सांघिक खेळाची माहिती व्हावी ,लहानपणीच त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी ,त्यांच्या अंगी असणाऱ्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे विनोद सुरवसे सर यांनी सांगितले.
लंगडी स्पर्धेतील विजेते:-
तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात प्रथम क्रमांक कार्ला, द्वितीय क्रमांक खंडेश्वरवाडी व तृतीय क्रमांक पवारनगर या शाळांनी मिळवला, तर मुलांच्या गटात प्रथम क्रमांक वाटेफळ ,द्वितीय क्रमांक इनगोदा व तृतीय क्रमांक पवारनगर या शाळांनी मिळवला . दोन्ही गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघांना बक्षीस म्हणून शाळेच्या वतीने रोख रक्कम ,प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रोमहर्षक सामना व उत्कृष्ट खेळाडू:-
मुलांच्या स्पर्धेतील चिंचपूर (सुर्वेवस्ती ) आणि आनाळा या संघातील सामना तब्बल तीन वेळा टाय होत अतिशय रोमहर्षक झाला .
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या दोन्ही गटातून एका -एका खेळाडूची निवड करण्यात आली .मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून कार्ला शाळेची राधा शिंदे हिचा तर मुलांच्या गटातून पवारनगर शाळेचा सोहम बडेकर या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
या दोन्ही उत्कृष्ट खेळाडूंना परंडा येथील श्रीराम अँग्रो सर्व्हिसेसचे प्रो.प्रा संतोष साबळे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस देऊन गौरव केला . तर महावीर इलेक्ट्रॉनिक्स परांडा चे प्रो.प्रा श्री महावीर रोकडे यांच्याकडून सर्व विजेत्या संघांना आकर्षक असे सन्मानचिन्ह देण्यात आले.
पंच म्हणून काम व बक्षीस वितरण:-
पंच म्हणून बाळासाहेब हजारे, आनंद गायकवाड, तानाजी तरंगे, आंबादास विरोधे, प्रशांत काळे , सदानंद चिंचोडीकर यांनी काम पाहिले .
स्पर्धेचे बक्षीस वितरण बाबुराव (आबा) गायकवाड, नामदेव (आबा ) पवार ,निवृत्त शिक्षक रावसाहेब सुरवसे ,शिवम पेडगावकर , जयराम जाधव , विलास सातपुते ,ईश्वर औसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष परिश्रम:-
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पवारनगर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय महादेव औसरे , उपाध्यक्ष राणी बडेकर ,आचारी धनंजय दत्तू औसरे ,सहदेव पवार , दत्ता बडेकर , जालिंदर औसरे,अतुल बैरागी , तेजस औसरे, दयानंद बडेकर, अर्जुन औसरे, मुख्याध्यापक प्रदीप टाक व आयोजक विनोद सुरवसे यांनी परिश्रम घेतले .
Discussion about this post