; एक ठार, एक जखमी…..
धामणगाव रेल्वे: तालुक्यातील देवगाव – जळका पटाचे या जिल्हा मार्गावर झालेल्या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील फाळेगाव येथील 45 वर्षीय दूचाकी चालकाचा घटनास्थळीस मृत्यू झाला हा अपघात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
फाळेगाव येथील जळकापटाचे रमेश बारसू महानोर (४५), दिनेश धुर्वे (४३) हे आपल्या दुचाकीने फाळेगाव धामणगाव येथे ट्रॅक्टर चे सामान घेण्यासाठी येत होते.
देवगाव जळका पटाचे दरम्यान रस्त्यावर उभ्या ट्रक क्रमांक टी, एस ०१- डी, सी ५६१७ उभा होता.
या उभ्या ट्रकला मागून दुचाकीने धडक दिली.
यात रमेश बारसू महानुर (४५) याचा घटनास्थळीत मृत्यू झाला, तर दिनेश धुर्वे (४३) हे गंभीर जखमी झाले. जखमीला प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्यानंतर, यवतमाळ येथील रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले.
Discussion about this post