चिंचपूर बुद्रुक तालुका परांडा येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. २३ ऑक्टोबर रोजी कै. विजयसिंह सदाशिवराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मा. रणजितसिंह पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अशोक काळे, ह.भ.प.अशोक कुंभार महाराज हे उपस्थित होतेयावेळी ह.भ.प.अशोक कुंभार महाराज यांनी विद्यार्थ्यांना विजयसिंह पाटील यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.आर. शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब मोरे, प्रदीप पाटील, काशिनाथ लोकरे, लक्ष्मण खारतोडे, विकास महाजन, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास देवकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रामकृष्ण गिरी यांनी केले तर एस.बी.कोळी यांनी आभार मानले
Discussion about this post