प्रतिनिधी पांडुरंग गाडेखेड: खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येलवाडी या ठिकाणी असणाऱ्या आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलवाडीला, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, मा. चेअरमन, आणि येलवाडी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच श्री रणजीत गाडे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली.
शाळेमध्ये चालू असणाऱ्या ॲप इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून कामांची पाहणी केली.
त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये केलेल्या परसबागेमध्ये जाऊन परस बागेमध्ये असणाऱ्या फुलझाडे फळांची झाडे त्याचप्रमाणे फळभाज्यांची पाहणी केली.
सरपंचांनी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेला सदिच्छा भेट देण्याच्या निमित्ताने सरपंच श्री रणजीत गाडे यांच्या समवेत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सौ मनीषा चौधरी, सौ.सुजाता गाडे, सौ प्रज्ञा बोत्रे, सौ बेबीताई पाटोळे, सौ उर्मिला गायकवाड, व शाळेतील मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम यांनी सरपंच श्री रणजीत गाडे व उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे शाळेला करत असलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले
Discussion about this post