परिसरात निवडणुकीचे वारे
सोसाठ्याच्या जोरात
समीर बल्की – तालुका प्रतिनिधी
भिसी :- विधानसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकले असून, जुठके – बुटके कार्यकर्ते भाऊ च्या प्रचाराची आतुरता करताना दिसत आहेत. अनेक ग्रामीण भागात सुधा निवडणुकीच्या चर्चेला उधाण येऊन पाटीवर जोर जोरात चर्चा होत आहे. भाऊ आमचा भाऊ आमचा पण भाऊ कोणता हेच कळेनासे झाले. पुन्हा त्यात भर म्हणजे की, परिवर्तनाची लाट आता पालटणार तर ग्रामीण भागात कोणत्या भाऊ बद्दल चर्चा रंगतात यात राजकीय जाणकारांनी पण गुडघे टेकले.ग्रामीण भागातील विकास आराखडा पाहता व ग्रामीण निरक्षर लोकांची हाक बघता परिवर्तन होणार, पण नेमके कोणाचे? अश्या चर्चा रंगताना अनेक ग्रामीण भागात दिसतात.
चिमूर विधानसभा क्षेत्राचा विचार करता दुहेरी लढत प्रामुख्याने दिसत आहे. याच दुहेरी लढतीची चर्चा जनसामान्य लोकांमध्ये दिसत आहे. कोणी नेत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले, कोणी पाठ फिरवली आता यायचं उत्तर म्हणून येत्या 20नोव्हेंबर ला खोक्यात बंद होऊन २३ ला जनतेत दिसणार? पण चर्चा इनकी रंगताना दिसून परिवर्तन होणार काय ? हा खूप मोठा प्रश्न जाणकार सांगतात. चिमूर विधानसभा क्षेत्र मोठे असल्याने सर्व क्षेत्रात नेत्यांनी आपली हजेरी गेल्या वर्षात लावली नसेल, पण निवडणुकीत मात्र हजेरीत पहिला नंबर लावणार. विकास केला असेल तर विकास सांगणार, नाही तर फोकनाड आश्वासन देऊन जनतेना पुन्हा भूलथापा देणार हे नक्कीच विधानसभा क्षेत्राच्या विकास, कामाच्या चर्चा गावा गावात होतात की, आम्हाला
दिवाळीचा चिवडा देऊन खुशकेले,
पण विकास कोसावर ठेवला. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, रोजगार, अन्नावरचा कर, रोडवरचा कर, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाजगीकरण, अश्या अनेक कार्यप्रणालीचा विश्लेषण ग्रामीण भागात होताना दिसत आहे. यावरून लक्षात येते की, परिवर्तन होणार असा अंदाज विधानसभेत वर्तवला जात आहे. पण येणारा नेता ही याच प्रमाणे काम करेल तर सामान्य जनतेने जायचे कोणा सोबत ? असाही प्रश्न येत आहे.
@@@@@@@@@@@@@@@@
जनतेची चर्चा सूत्राच्या माहितीनुसार*
आमदराकडे कधी आपुलकीची भेटगाठ होईल या भावनेने जनता जात असल्यास कार्यकर्तेच सामान्य माणसाला आमदारा पर्यंत पोहचू देत नाहीत, ज्या दिवशी आमदराच्या भेटीसाठी जनता जनसंपर्क कार्यालयात येत असते तर वाड्यावर या असे संबोधतात. तर.. आमदार आहेत की, पाटील?, दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नाही बाहेरून घेण्यास अधिकारी सांगतात, तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही सर्व समस्येने भरून उपजिल्हा रुग्णालय आहे. तर रोग्यांवर काय उपचार होणारं? हा विकास केव्हा करणार ? लाडकी बहिण म्हणून योजना काढली पण तेलाचे भाव, पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई करून खिसा रिकामा करताय याच काय? आमदार म्हणून अनेक निवेदन देण्यात आले, त्याचे उत्तर अद्याप नाही यावर कधी बोलत नाहीत.
@@@@@@@@@@@@
आमदाराच्या मते विकासाची परिभाषाः
दहा वर्षात चिमूर शहराला महामार्ग जोडल्या गेला, समाजमंदिर बांधने, लाडकी बहिणी च्या माध्यमांतून महिलांना १५०० रुपयाची मदत करत आहोत. सविधानाचे रक्षण करत आहोत. शेतकऱ्यांचा पाण्याचा व विजेचा प्रश्न लवकरच निकाली लावणार, दवाखान्यात सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देणार, रोजगार उपलब्ध करून देणार
Discussion about this post