
माजी आमदार राहुल मोटे यांनी भरला तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज
परंडा 243 विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी झाल्या असुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून परंडा येथील रणजित पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली व उद्धव ठाकरे यांनी त्यांना ए बी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे प्रमुख दावेदार असणारे राहुल मोटे यांना धक्का बसला.
गेल्या निवडणुकीत राहुल मोटे यांचा निसटता पराभव झाला होतो त्यामुळे त्यांची दावेदारी मानली जात असताना मात्र महाविकास आघाडी कडून अधिकृत घोषणा होण्याच्या अगोदर रणजित पाटील यांना पक्षाने उमेदवारी घोषित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत वरिष्ठ स्थरावर चर्चा सुरू केली. मात्र त्या अगोदरच माजी आमदार राहुल मोटे यांनी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी चिन्हावर उमेदवारी दाखल केल्याने आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. परंडा विधानसभा मतदार संघात मैत्री पूर्ण लढत होणार का? हे 4 तारखेला स्पष्ट होणार आहे.
Discussion about this post