
दिंडोरी (नाशिक) प्रतिनिधी :-
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील रहिवासी कांचन विठ्ठल भवर ईने विरंगणा दयावती कव्हर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिंडोरी येथे झालेल्या ऑगस्ट सन २०२३ ते जुलै २०२४ प्रशिक्षणात व्यवसाय ( ट्रेड) कॅम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्ट(कोपा) परीक्षेत कांचन भवर ईने ६०० पैकी ५२४ गुण प्राप्त करून संस्थेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल संस्थेचे प्रा.शैलेंद्र नलवडे व मान्यवरांनी पदवीदान समारंभ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
वर्गशिक्षक दिलीप इंगळे व गायत्री गवारे यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल सरपंच रेखा गांगुर्डे उपसरपंच बबलू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण सोसायटीचे चेअरमन नाना गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भवर यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post