
आजरा – तालुका प्रतिनिधी,
उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवित असतात. त्यामुळे उमेदवार इकडून तिकडे उड्या मारणे अनेकांना रुचत नाही. निकालात याची प्रचिती अनेक राज्यात दिसते काही मतदार संघ याला अपवाद आहेत. उमेदवारानी पक्ष बदलला तरी कोल्हापूर जिल्ह्यात सहा उमेदवारांनी गुलाल उधळला.
त्यामध्ये बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, अमल महाडीक, उल्हास पाटील यांनी पक्ष बदलूनही जनतेने त्यांना दुसऱ्यांदा पक्षातून उभे राहिल्यानंतर विधानसभेत पाठविले आहे.
खानविलकर यांना राष्ट्रवादीतून यश,
दिग्विजय खानविलकर हे १९८०, ८५, ९० व ९५ असे चारवेळा आमदार झाले. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार यांनी स्थापना केली त्यावेळी खानविलकर हे पवार साहेबांचे निकटवर्ती आहेत त्यावेळी कॉंग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला पुढे १९९९ ला ते राष्ट्रवादीतून पक्षातून विजयी झाले.
बाबासाहेब कुपेकर यांनी,१९९५ ला कॉंग्रेस या चिन्हावर निवडून विधानसभेवर गेले, राष्ट्रवादी पक्षात१९९९ घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवून
गडहिंग्लजकरांनी पक्ष बदलूनही गुलाल उधळला,
सदाशिवराव मंडलीक यांचा करिष्मा, कागल मतदार संघातून १९७२ ला अपक्ष राहून विजयी झाले, एस. कॉंग्रेस मधून विधानसभा१९९५, पुढे१९९०, १९९५ ला कॉंग्रेस आय मधून विजयी झाले नंतर काँग्रेसला रामराम ठोकला, १९९९ ला व २००४ ला राष्ट्रवादीतून लोकसभेत गेले २००९ ला अपक्ष उभे राहून विजयी झाले त्यांनी पक्षापेक्षा स्वतःचा करिष्मा असल्याचे सिद्ध केले होते.
भगवा हातात घेवून उल्हास पाटील शिरोळ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यरत असणारे २०१० मध्ये निवडणूकी अगोदर शिवसेनेत प्रवेश केला व विजयी झाले. स्वाभिमानी सोडून अचानक भगवा हातात घेवून विजयी झाले.
अमल महाडीक यांचा विजय २०१४ च्या अगोदर काँग्रेस मधून जिल्हा परिषद सदस्य होते. निवडणूकी अगोदर भाजपमध्ये प्रवेश करून कोल्हापूर दक्षिण मधून विजय मिळविला
मा. विनय कोरे, नरशिंगराव पाटील, यांची बाजी
चंदगड विधानसभा आमदार नरसिंगराव पाटील १९९० ला काँग्रेस तिकीटावर निवडून विधानसभेत गेले१९९९ ला राष्ट्रवादीतून तर २००४ ला जनसुराज्य कडून लढले व विजयी झाले, विनय कोरे पुढे २००४ ला जनसुराज्य पक्षाकडून आमदार झाले.
Discussion about this post