जागजी : धाराशिवतालुक्यातील जागजी येथील पाटील बंधुंच्या एन व्ही पी शुगरने गेल्या गळीत हंगामात गाळपास ऊस दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त पाच किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले.
कारखान्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ऊस उत्पादकांची यानिमित्ताने दिवाळी गोड झाली आहे.
जागजी येथे नव्यानेच उभा राहिलेल्या एन व्ही पी शुगरच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणगाळपास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने उसाचे पेमेंट करून कारखान्याने परिसरात एक आदर्श निर्माण केला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा साखर कारखाना म्हणून एन. व्ही.पी. शुगरकडे पाहिले जात आहे.
याच अनुषंगाने या साखर कारखान्याच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी गाळपास ऊस दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त पाच किलो साखरेचे मोफतवाटप करण्यास सुरुवात झाली आहे.
या मोफत साखर वाटपाचा शुभारंभ कारखानास्थळी एन व्ही पी चे सर्वेसर्वा नानासाहेब पाटील, गावचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील, विद्यमान सरपंच व्यंकट बंडगर, माजी उपसरपंच भीमराव सावंत, विकास पाटील, चंद्रकांत माळी, सुरेश सावंत, संतोष सावंत, राजाभाऊ सावंत, कृष्णा सावंत, राजाभाऊ देशमुख, रणधीर पाटील, दीपक गाढवे, दिलीप देवळकर, मधुकर शिंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Discussion about this post