
वर्धा प्रतिनिधी:- रूपेश संत
वर्धा:-
पोलिस ठाणे हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुंड सोनीहालसिंग ऊर्फ सोनू समीरसिंग भादा याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करत त्याची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली.
हिंगणघाट शहरातील संत चोखोबा वॉर्ड येथील कुख्यात गुंड सोनीहालसिंग ऊर्फ सोनू समीरसिंग भादा (२४) याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस विभाग, ठाण्याच्या अभिलेखावर शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध १०
गुन्हे नोंद आहेत. ज्यामध्ये घातक शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, दारू बाळगून विक्री करणे, घरफोडी करणे, चोरी करणे, जुगार चालविणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तो सतत गुन्हे करण्याच्या सवयीचा गुन्हेगार होता. त्याच्यावर नोंद गुन्ह्यांपैकी चार योजना गुन्हे पोलिस तपासावर असून, सहा अभाव गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत.
गेल्या ४ ते ५ वर्षांपासून परिसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती.
त्याच्या दहशतीमुळे अनेकजण त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याससुद्धा धजावत नव्हते. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याच्याविरुद्ध कलम ५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये तडीपारची कारवाई करण्यात आली होती. परंतु, अशा प्रतिबंधक कारवाईलासुद्धा तो जुमानत – नसल्याचे निदर्शनास आले. त्या – अनुषंगाने ठाणेदार मनोज गभणे यांनी एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस • अधीक्षक अनुराग जैन यांच्यामार्फत – जिल्हा दंडाधिकारी राहुल कर्डिले यांना सादर केला होता. याची गांभीर्याने दखल घेत सोनीहालसिंग याच्याविरुद्ध स्थानबद्ध आदेश
जारी केला. त्याला अमरावती जिल्हा- मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.
Discussion about this post