

त्या प्रसंगी माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. आपल्या सर्वांचे प्रेम व जिव्हाळा पाहुन मी भारावुन गेलो. मागील ५ वर्षाच्या काळात मी आपला जनसेवक माजी कॅबिनेट मंत्री ना.संजय बाबुराव बनसोडे यांनी केलेल्या कामाची ही पावती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करुन त्यांचे आभार व्यक्त केले.
मी शब्द दिला आणि तो पूर्ण सुद्धा केला आहे. पूर्वीचे आणि आत्ताचे उदगीर यामध्ये बराच फरक आहे. मात्र तरीसुद्धा आणखीन बराच विकास बाकी आहे त्यासाठी पुन्हा एकदा मला तुम्हा सगळ्यांच्या साठीची गरज आहे आपण सर्वजण एकत्र येऊन एकजुटीने विकासपर्व आणूयात. उदगीर-जळकोट राहिलेला विकासाच्या रोल मॉडेलचा इतिहास घडवूया..
जो शब्द दिला होता, त्या शब्दाप्रमाणे विकास घडवला आहे. आता पुढचे पाऊल उदगीरच्या प्रगतीच्या दिशेने विकासपर्व आणण्यासाठी असणार आहे. या प्रवासात तुमची सोबत मोलाची ठरणार आहे. कारण जे झालंय आजवर ते आपल्या सगळ्यांमुळे झालंय जो विकास दिसतोय, जे उदगीर व जळकोट दिसतय..
Discussion about this post