
प्रतिनिधी पांडुरंग गाडे
खेड आळंदी ची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी शेठ काळे आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार या कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे . उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच चालू आहे.
खेळ आळंदीची जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रबळ दावेदार असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल शेठ देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे अतुल देशमुख काय निर्णय घेतात अपक्ष निवडणूक लढवणार की महा विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सध्या खेड तालुक्यात चालू आहे.
खेड आळंदी विधानसभेची जागा अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला
कोण असणार उमेदवार बाबाजी काळे की अमोल पवार
अतुल देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
Discussion about this post