आमदार कैलास पाटील उद्या भव्य रॅली काढून दाखल करणार उमेदवारी अर्जस्वाभिमानी बाणा, खोक्यांना लाथ मारणाऱ्या निष्ठावंत आमदारासाठी एकत्र या, शिवसैनिकाचे आवाहनशिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील महाविकारा आघाडीच्या वतीने सोमवारी (दि.२८) धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अजे दाखल करणार आहेत.
नामांकन भरण्यापूर्वी सकाळी शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. स्वामिमानी बाणा असलेल्या निष्ठावान सैनिकासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती भयाम जाधव यांनी केले आहे.
आमदार कैलास पाटील यांनी कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात सामान्य जनतेची काळजी घेतली.
तसेच एक सुसज्ज शासकीय महाविद्यालय उभे केले, त्याच व्यक्तीसाठी खोके व मंत्रीपदाच्या पायघड्या टाकल्या, त्यावेळी या नेत्याने स्वाभिमानी बाणा दाखवत जनतेशी इमान राखण्याचे काम केले, खोके आणि मंत्रीपदाला लाथ मारलेल्या या प्रामाणिक माणसाला साथ देण्याची वेळ आली असून, सामान्य घरातील हक्काचा आमदार यांना साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक क्षाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.
मुख्य मार्गावरून भव्य रॅली नाहाकन भरण्यापूवी सकाळी १० वाजता रॅली काढण्यात येणार ही रॅली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दिनी मंदिर, हजरत ख्याजा शमशोद्दीन गाझी दर्गा, नेहरू चौक, काळा गास्ती मंदीर, संत गाडगे बाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, अशी असेल.

Discussion about this post