
महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मोत्सवाचे औचित्य
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा — तालुक्यातील तपोभूमी अमरगड (वाई गौळ) येथे तप साधना केलेले महान संत काशिनाथ बाबा यांचा जन्मोत्सव भक्त परिवाराकडून दरवर्षी मोठ्या थाटात साजरा केल्या जातो. 112 व्या जन्मोत्सवाचे औचीत्यावर श्री शिवरुद्राभिषेक तथा बिल्वार्चन महापूजेचे आयोजन मंदिर परिसरात धनत्रयोदशीला येत्या मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा यांचा साधक परिवार मोठ्या संख्येत असून धनत्रयोदशीच्या रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी जन्म झालेल्या तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा यांचा जन्मोत्सव भक्त परिवार आणि अमरगड (वाई गौळ) पंचक्रोशीतील साधकांच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो.
गतवर्षी तपस्वी संत श्री बाबाजींच्या १११ व्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात १११ दांपत्यांचे श्रीशिवशक्ती महायज्ञाचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले होते.
संत श्री बाबाजींच्या ११२ व्या जन्मोत्सवानिमित्त यावर्षी धनत्रयोदशीला सायंकाळी सहा वाजता श्री शिवरुद्राभिषेक तथा बिल्वार्चन महापूजेचे आयोजन भक्तांसाठी करण्यात आले असून साधकांनी या महापूजेचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड.मनोज राठोड,विनोद राठोड, श्याम राठोड, डॉ. के.एम. चव्हाण आणि ॲड.श्रीकृष्ण राठोड आणि सर्व भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बॉक्स–
श्री शिवरुद्राभिषेक तथा बिल्वार्चन महापूजा नंतर रात्री साडेअकरा वाजता जन्मोत्सवानिमित्त आयोजकांकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
Discussion about this post