
विहिरगांव प्रतिनिधी:- रजत चांदेकर
प.स.राळेगाव अंतर्गत येणाऱ्या रिधोरा या गावामध्ये व.रा.तुकडोजी महाराज यांची समुदायिक प्रार्थना व ध्यानपाठ 22 वर्षापासुन करत आहे या उपासनेला गावातील संस्काराची शाळा म्हणून ओळखल्या जाते.प्रार्थना ही रोज सायं 6.30 ला चालू होते या प्रार्थनेला रोज् गावातील लहान मोठी 120 ते 165 पर्यंत मूल् मुली हजर असते. त्यांचे आई वडील त्यांना स्वतः तिथे आणतात .प्रार्थनेच्या माध्यमातून मुलांना स्पर्धा परीक्षा ,संगीत,गायन ,वादन, योगासन,लाठी काठी यासारखे शिक्षण तिथे दिल्या जाते .अशा पद्धतीने राष्ट्रसंताचे विचार आजच्या युवकांमध्ये पोहचवण्याचं कार्य अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ करीत आहे यावर्षी चा 56 वा पुण्यतिथी मोहत्सव रिधोरा या गावामध्ये गुरुकुंज मोझरी प्रमाणे संगीतमय करण्यात आला .
Discussion about this post