
वर्धा प्रतिनीधी: – रुपेश संत
वर्धा:-वर्धा ते पुलगाव रस्त्यावर निमगाव परिसरात असलेल्या एका धाब्यावरून अवैधरित्या डिझेलचा साठा करून विक्री करणाऱ्या एकास पकडून सावंगी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
निमगाव येथील राजकमल धाबा अॅण्ड रेस्टॉरंट परिसरात एक व्यक्ती अवैधरित्या डिझेल बाळगून विक्री करीत असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार
पोलिसांनी धाब्यावर छापा मारला असता ब्रिजेशकुमार अंगदप्रसाद पटेल (२३ रा. काटी, जि. रिवा ह.मु, निमगाव) हा अवैधरित्या डिझेल बाळगून विक्री करत असल्याचे दिसले. त्याच्याकडून धाब्याच्या किचन रूमच्या बाजूला
असलेल्या प्लास्टिक डबक्यांमध्ये असलेला डिझेल साठा जप्त करून गुन्हा दाखल केला.
या प्रकरण ची सखोल चौकशी सावंगी पोलीस करत आहेत.
Discussion about this post