

वर्धा प्रतिनिधी:- रुपेश संत
वर्धा’:-
गोरगरीब बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, त्यांच्या आनंदात आपण सहभागी व्हावे या उदात्त हेतूने अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने अंबिका हिंगमिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रवा साखर वाटप केले.
काल पहिला टप्पा पार पडला यामध्ये बोरगाव मेघे, हनुमान नगर,सिद्धार्थ नगर, नागसेन नगर येथील घरोघरी जाऊन माझ्या गोरगरीब, अपंग, निराधार, कामगार बांधवांना रवा साखरेचे वाटप केले. आपण समाजाचे
देणे लागतो त्यामुळे समाजासाठी प्रामाणिक आणि निस्वार्थपणे कार्य पार पडावे यासाठी अंबिका सोशल फाउंडेशन समाजा साठी कायम कार्यरत असते. काल दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पहिला टप्पा पार पडला असून उद्या उर्वरित परिसरात दुसरा टप्पा पार पडेल.सर्व गरजू व्यक्तीने लाभ घ्यावा
अशी माहिती फाऊंडेशन च्या अध्यक्षा अंबिका हिंगमिरे व त्यांच्या सहकारी मंडळी च्या वतीने करण्यात आली आहे.
Discussion about this post