
आजरा – तालुका प्रतिनिधी,
माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला आपण संधी दिलात, त्यामुळे इतकी विधायक कामे करता आली. महायुतीचे सरकार जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५००० अनुदान, गाईच्या दुधाला प्रती लिटर सात रुपये अनुदान, काजूला अनुदान यांसारख्या अनेक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतले आहेत. विकासाचा रथ तेवत ठेवायचा असेल तर महायुतीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून मला विजयी करा.
यावेळी पांडुरंग रेडेकर (मा. पोलीस पाटील), अनिल फडके, संभाजी रेडेकर, वसंत रेडेकर, गिरी कोकितकर, तुकाराम फडके, अनिल सूर्यवंशी, सुरेश रेडेकर, सुधीर देसाई,( केडीसी बॅक, संचालक ) अभय देसाई, एम.के.देसाई, सरोळी,शिवाजी नांदवडेकर, सुभाष पाटील, महेश भोसले आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post