प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी जिल्हा.
पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक साठी उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असून उमेदवारांना त्यांचे पक्षाचे व स्वतःचे प्रचार करण्यासाठी विविध साधनांचा उपयोग करावा लागतो विविध प्रचार सभा, प्रचार पदयात्रा रॅली, पथनाट्य, विविध वाहनांचा वापर ,उमेदवारांचे प्रचार कार्यालय, वाहनाद्वारे प्रचार त्यासाठी स्पीकर्स , झेंडे , इत्यादींचा उमेदवार प्रचारासाठी वापर करतात परंतु या सर्व बाबींसाठी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचनानुसार त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयाकडून सर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी पाथरी विधानसभा मतदारसंघ कार्यालय तहसील कार्यालय पाथरी येथे स्वतंत्र एक खिडकी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षामार्फत उमेदवारांना विविध प्रकारच्या परवानगी दिली जाते उमेदवारी नामनिर्देशन पत्र भरण्याचे सुरुवात झाल्यापासून आज अखेर पर्यंत विविध उमेदवारांनी राजकीय सभा 7 , पदयात्रा रॅली 12 , पथनाट्य एक , वाहन परवाना 7 , लाऊडस्पीकर एक , असे परवाने निवडणूक विभागाकडून वितरण करण्यात आल्याचे माहिती श्री गंगाधर यलहारे नायब तहसीलदार एक खिडकि सुविधा कक्षाचे पथक प्रमुख यांनी दिली सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी विविध परवाने घेऊन आपला प्रचार करावा प्रचारादरम्यान आदर्श
आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी जाण ठेवावी असे आवाहन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी केले आहे.
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.७२१८२७५४८६
Discussion about this post