
प्रतिनिधी पांडुरंग गाडे,
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार श्री दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ खेड तालुक्यातील डेहणे या ठिकाणी बुधवार दिनांक 30 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी ठीक 12/00 वाजता कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरा सभा संपन्न झाल्यानंतर आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील हे गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी गाव भेट दौरा करणार आहेत.
सकाळी 09:00 वा. धामणगाव खुर्द
सकाळी 10:00 वा. शेंदुर्ली
दुपारी 03:00 वा. एकलहरे
दुपारी 04:00 वा. गोरेगाव
सायं. 05:00वा. सुरकुंडी
सायं.06:00 वा.माजगाव
सायं. 07:00 वा.कळमोडी
रात्री. 08:00 वा.घोटवडी
रात्री. 09:00 वा. परसुल
रात्री. 10:00 वा. खरपुड
या नियोजनानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचा गावभेट दौरा राहणार असून या दौऱ्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त मतदार बंधू-भगिनींनी आपले आशीर्वाद महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक येलवाडी नगरीचे माजी चेअरमन आणि विद्यमान लोकनियुक्त सरपंच श्री रणजीत शेठ विठ्ठल गाडे यांनी केली आहे..
Discussion about this post