शिरोळ/प्रतिनिधी-
कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गणपतराव पाटील हे नेहमीच काँग्रेस पक्षाशी तसेच महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहून त्यांनी आतापर्यंत काम केले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेऊनच आघाडीनेही त्यांना शिरोळ विधानसभेची उमेदवारी दिली आहे.
या उमेदवारीमुळे त्यांना अधिक चांगले काम करण्याची संधी मिळणार आहे. ते चांगल्या मताने निवडून येतील याची खात्री आहे. शिरोळ तालुक्याच्या विकासासाठीचे चांगले काम त्यांच्या हातून होईल ही मला अपेक्षा आहे.
गणपतराव पाटील यांनीही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post