यावेळी,नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवार हे आमचे कालपण होते, आजपण आहेत आणि उद्यापण राहणार.पवार साहेबांना सांगूनच आम्ही युती केली आहे. त्यामुळे नेत्यांनी येथे येऊन जास्त एकनिष्ठतेची फुशारकी मारण्याची गरज नाही. या विधानसभा मतदारसंघांमध्ये इतके उमेदवार उभे राहिले आहेत की त्यामुळे समजेना झालय की ही ग्रामपंचायतची निवडणूक आहे की विधानसभेची.येणार्या विधानसभेला राजेश पाटलांना बहुमताने निवडून द्या आणि पुन्हा विधानसभेमध्ये पाठवा व त्यांना महायुती मध्ये राज्यमंत्री करण्याची संधी आम्हाला व आमच्या पक्षाला मिळेल.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महायुतीचे सरकार एकमेकांच्या समन्वयातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे,पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे, हे कोल्हापूरच्या उदाहरणावरून दिसून येते.चंदगड तालुक्यासारखा सुंदर भाग महाराष्ट्रात कुठेही नाही,या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे. त्यासोबतच राजेश पाटील हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाणे गरजेच आहे.येत्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हाचे बटन दाबून राजेश पाटील यांना प्रचंड मताने विजयी करा.
मा.खासदार संजय मंडलिक म्हणाले,२०२४ चा निवडणुकीमध्ये राजेश पाटील विजय होतील हे प्रचंड जनसमुदायावरून आणि वरूण राजाने लावलेली हजेरीवरून ओळखते. महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजना पुढे कार्यान्वित ठेवायच्या असतील तर राजेश पाटील साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या.
१६०० कोटींचा हिशोब मागणाऱ्यांना २३ नोहेंबरला जनताच उत्तर देईल.
⏹ सभेसाठी वरुणराजाने लावलेली उपस्थिती ही २०१९ विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार याची नांदीच आहे.
आदरणीय ना हसन मुश्रीफ साहेब माझ्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्यामुळेच मिळाली होती.
तुमच्या सर्वांच्या ताकदीवर,हिमतीवर,आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय होणार हा मला विश्वास आहे.
१६०० कोटी म्हणजे चिंचोके नव्हेत, तुम्हाला मोजता येत नसेल तर विचारू नका.अनेकजण पोकळ वल्गना करत आहेत.१६०० कोटी रुपयांचा हिशोब २३ नोव्हेंबरला जनताच त्यांना देईल.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी वरूण राजाने उपस्थित दाखवलेली आणि मी विजयी झालो होतो. यावेळीही वरूण राजाच्या कृपेने आणि रवळनाथाच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे,असा मला विश्वास आहे.
यावेळी,यावेळी,गडहिंग्लज कारखान्याचे चेअरमन प्रकाश भाई पताडे, व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण, माजी जि प उपाध्यक्ष सतीश राव पाटील, आजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन एमके देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर भाऊ देसाई, संतोष पाटील, अल्बर्ट डिसूजा, बाबासाहेब पाटील मुगळीकर, रामाप्पांना करीगार, माजी जिप सदस्य हेमंत कोलेकर,जयसिंगराव चव्हाण, जयकुमार मुन्नोळी, आजरा कारखाना संचालक सुभाषराव देसाई, राजू मुरकुटे, जयकुमार मुन्नोळी, भरमाना गावडा, दयानंद काणेकर, ब्लॅक पॅंथर चे सुभाषराव देसाई, नामदेव निटूरकर, शिंदे सेनेचे संजय संकपाळ, बाबुराव चौगुले, भरत पाटील, लक्ष्मण तोडकर, सागर भाऊ देसाई, चंद्रकांत सावंत, सौ सुश्मिता राजेश पाटील, निखिल राजेश पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post