इगतपुरी मतदार संघ अपक्ष उमेदवार रविंद्र भोये यांनी भरला उमेदारी अर्ज
स्थानिक भुमिपुत्र म्हणून जनतेचा प्रचंड प्रतिसाद
दि.29/ आॅक्टो रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे रविंद्र भोये यांनी आपल्या उमेदवारीचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे, शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र महायुतीने राष्ट्रवादीला जागा सोडल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व जनतेच्या प्रतिसादामुळे भोये यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मा.आमदार पांडुरंग गांगड, पंचायत समिती सदस्य रघुनाथ तोकडे, सभापती संपत काळे, मराठा समन्वयक हरिभाऊ बोडके, उपजिल्हा प्रमुख मिथुन राऊत, अशोक लांघे,दादु बाबा कनोजे,तुकाराम लचके, संजय महाले, अक्षय मोरे, ज्ञानेश्वर भोये, सुरेश गायकवाड, विष्णू बेंडकोळी, विठ्ठल पवार,भरत खोटरे, रमेश लहारे, रमेश तरवारे, जनार्दन भोये,एकनाथ पवार, हेमंत बागुल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post