AVH घालवताना तुमचं रूप एका वाघिणीला लाजवेल अस होतं पण ते रूप ,ते कष्ट तिकीट मिळवण्यासाठी नक्कीच नव्हते ,फक्त होतं ते चंदगड ची हिरवाई टिकावी ,चंदगड ची हवा विषारी होऊ नये, ,पुढची पिढी आपल्याला माफ करनार नाही ,येवढ्या हुशार लोकांनी या तालुक्याच प्रतिनिधित्व केलं तर त्यांच्यावर डाग येऊ नये म्हणून तुम्ही तुरूंगापर्यंत पोहचला ,1600 कोटी आणायला तुरुंगात जायला लागत नाही, फक्त गृहहटी मार्गे जावे लागते
दही हंडी ठेवणे, जेवणावळी, मंडळांना पैसे हे सगळं ठीक पण तालुका विषारी झाला असता तर तालुका। अशक्त, दमेकरी झाला असता , त्या लढाईत हे सगळे वीर पुरुष कुठे होते.
ताईसाहेब, तुमची उमेदवारी हे 50 वर्षाच्या निष्ठेच फळ आहे ,स्व कुपेकर साहेब, आईसाहेब, यांचा राजकारणात न चालणारा प्रामाणिक पणा , लोकांच्याही असलेले आपुलकीचे नाते हेच हे फलित आहे
परमेश्वराने साहेबाना आयुष्य कमी दिले ,लोक साहेबांच्या जाण्याने फार हळहळले ,आज परमेश्वराने लोकांची इच्छा पूर्ण केली ,परमेश्वर साहेबांचे आयुष्य वाढवू शकला नाही पण देवाने तुमच्यावर जबाबदारी टाकून लोकांची इच्छा पूर्ण केली ।
परमेश्वर एवढा मोठा निर्माता आहे ,तो महत्वाची भूमिका सक्षम माणसालाच देतो
ताईसाहेब तुमची जबाबदारी फार वाढली आहे ,पण। साहेबांचा आशीर्वादाने तुम्ही कुठेच कमी पडणार नाही हे निश्चित
ताईसाहेब ,तुमचे त्रिवार अभिनंदन, आणि खूप खूप शुभेच्छा।
Discussion about this post