

मोहोळ प्रतिनिधी/
मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या राखीव जागेसाठी यशवंत माने यांनी काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अंतरवाली सराटी (जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांची बाळराजे पाटील यांच्या समवेत सदिच्छा भेट घेऊन जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्व मुद्दे नमूद करुन जरांगे-पाटील यांच्या कडे प्रतिज्ञापत्र सादर केले.
गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या सोबत आणि गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईत प्रामाणिक नेतृत्व मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या सोबत आरक्षणाच्या प्रत्येक मागणीसाठी आम्ही वेळोवेळी कालही सोबत होतो आणि इथून पुढेही सोबत राहणार असल्याचे बाळराजे पाटील व यशवंत माने यांनी सांगितले..
Discussion about this post