
November 3, 2024
सावदा, ता. रावेर. l ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या मुहूर्तावर पती – पत्नी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रावेर तालुक्यातील विवरा खुर्द या गावी आज दुपारी घडली.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथिल कुंभारवाडा येथे आज दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास अनिल देविदास हरणकर. वय ४० वर्ष. व पत्नी शितल अनिल हरणकर. वय ३५ वर्ष. यांनी टोकाचे पाऊल उचलत कुंभरवाड्यातील घरात वरच्या रूम मध्ये रुमालाने गळफास घेत आत्महत्या केली. हि घटना भाऊबीजेच्या दिवशीच घडल्याने मोठी खळबळ उडाली.
या दोघांना १ मुलगी व २ मुले असून विटाच्या भट्यावर काम करुन हे दोघं आपल्या कुटुंबाचा करतात. ही घटना त्यांचा लहान मुलगा पाणी पिण्यासाठी वरच्या रूम मध्ये गेला असतां त्याला दिसल्याने त्याने आरोळी मारली असता आजू-बाजू चे लोक जमा होऊन त्यांनी त्या दोघांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले..
Discussion about this post