
आजरा – तालुका प्रतिनिधी,
सध्याच्या जीवनात धावपळ दगदग, करून पोटाची खळगी भरणारे, कामाला गेल्याशिवाय उदरनिर्वाह चालत नाही. अशी परगावाहून तसेच कष्टाळू होतकरू गरिब लोकांना दिवाळीचे औचित्य साधून सुभाष कांबळे यांचेसह मित्रपरीवारा मार्फत काही गरिब व मुस्लिम बांधवांना त्यांच्या कुटूंबात फराळ वाटप करून यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली.
याचे कारण म्हणजे दैनंदिन कामात वेळातवेळ काढून सम – समारंभ साजरे करणे शक्य नाही, याचा विचार करून त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी सुभाष कांबळे व त्यांचे मित्रपरीवारामध्ये, स्वप्निल गुरव, प्रकाश शिंदे, गणेश कांबळे, सिध्दार्थ कांबळे, बबन कांबळे, शुभम कांबळे यांनी त्यांच्या समवेत दिवाळीचा आनंद साजरा केला.
Discussion about this post