
( गोरठेकरांचे मानसपुत्र डॉ. विभुते + गोरठेकर घराण्याचा हाथ = विजय पक्का )
नायगाव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
89 नायगाव विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढत असून सध्या तरी महाविकास आघाडीकडून डॉ. मिनल पाटील खतगावकर महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पवार वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. माधव विभुते तर अपक्ष म्हणून उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शिरीष देशमुख गोरठेकर यासह शिवराज पाटील होटाळकर हे रिंगणात आहेत यापैकी कुणी माघार घेईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत….
वरील सर्व उमेदवारांपैकी असे दोन उमेदवार असे आहेत जे की एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांनी वेगवेगळे निवडणूक लढवण्यापेक्षा एकत्र आले तर विजयाचे समीकरण दृष्टीक्षेपात येऊ शकते. वंचितचे डॉ. माधव विभुते यांच्या जीवनात स्व. बाबासाहेब गोरठेकर व स्व. बापूसाहेब गोरठेकर यांचे विशेष स्थान असून विभुते यांचे आराध्य दैवत जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर दुसरीकडे शिरीष देशमुख गोरठेकर यांना ‘दिलेल्या शब्दाला जगणारा वाघ ‘ असे बिरूदावली रूढ झालेल्या गोरठेकर घराण्याचे ते वंशज असून त्यांच्या मागे घराण्याने प्रेम केलेल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी असून त्याच आधारावर ते आता अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
89 नायगाव विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार यांच्या पक्षास मिळावा अन आपण पवार गटाकडून निवडणूक लढवावी असा शिरीष देशमुख यांचा मानस होता, महाविकास आघाडीकडून अगदी शेवटच्या क्षणी हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर झाल्यावर अवघ्या काही तासात वंचितची उमेदवारी डॉ. विभुते यांना मिळाली याचे कारण म्हणजे जर शिरीष देशमुख गोरठेकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढवणार नसल्याचा डॉ. विभुते यांनी पवित्रा घेतला होता.परंतु राजकीय समीकरणे उलटी पडल्याने डॉ. विभुते यांनी वंचितकडून उमेदवारी घेत आपले नामांकन पत्र देखील सादर केले आहेत.
याच मतदार संघातून 2019 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढवणारे राजेश पवार यांचा मोठा विजय प्राप्त झाला होता, त्यांच्या विजयात वाटा नव्हे तर सिंहाचा वाटा स्व. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा होता. जो पर्यंत स्व. बापूसाहेब देशमुख जिवंत होते तो पर्यंत राजेश पवार यांची ब्र शब्द काढायची हिंमत झाली नव्हती परंतु स्व. बापूसाहेब देशमुख यांचे निधन झाल्यावर उमरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बसवण्याच्या निमित्ताने पवार यांनी आपली वैचारिक पातळी दाखवत स्व. बापूसाहेब देशमुख यांच्यावर टिकास्त्र सोडत गोरठेकर समर्थकांची नाराजी मोठ्या प्रमाणात ओढून घेतली होती. विविध कारणातून मागील एका वर्षात राजेश पवार विशेष चर्चेत राहिले असून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे, बॅनरच्या माध्यमातून प्रश्न विचारल्याबद्दल मनसेचे सचिन रेड्डी व हणमंत कत्ते नामक युवकांवर गुन्हे दाखल करणे असो, साहेब रस्ता चांगला होत नाही म्हटल्यावर तुझ्यावर गुन्हे दाखल करतो अशी धमकी देणे असे विविध प्रकार करत त्यांनी मी व माझी सौभाग्यवती शहाणा असल्याचे वारंवार सिद्ध केले आहेत.
याच राजेश पवारला सडेतोड उत्तर मतपेटीतुन दाखवून देण्यासाठी गोरठेकर यांचे मानसपुत्र डॉ. विभुते व पुत्र शिरीष देशमुख हे निवडणुकीला सामोरे जात आहेत, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे डॉ. विभुते यांना मतदार संघातील बहुसंख्य बहुजन हरिजन यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून तत्कालीन भोकर व आताच्या नायगाव मतदार संघातील बहुतांश लिंगायत समाजाने गोरठेकर घराण्यावर विश्वास ठेवत नेहमीच त्यांना साथ दिली असून आता मात्र मतांचे विभाजन न होण्यासाठी ज्या गोरठेकरांनी राजकारणात किंग न होता पवार यांना निवडून आणून किंगमेकर ठरले होते अगदी त्याच प्रमाणे शिरीष देशमुख गोरठेकर व कैलास देशमुख गोरठेकर यांनी किंग होण्याचा प्रयत्न न करता किंगमेकर व्हावे हेच यशाचे गमक होऊ शकते असा विश्वास लिंगायत समाजाला असून अन तसेही डॉ. विभुते हे राजकारणात पाऊल ठेवण्याअगोदर पासून गोरठेकर घराण्याचे एकनिष्ठ असून गोरठेकर घराणे म्हणेल तो कायदा हा प्रमाण मानणारे असून त्यांना गोरठेकर घराण्याने समर्थन देऊन डॉ. विभूते यांना साथ देत किंग मेकर व्हावे ही काळाची गरज आहे असल्याची भूमिका लिंगायत समाजाने व्यक्त केली आहे….
Discussion about this post