महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर तालुका हवेली येथे अजित पवार यांची शनिवारी तारीख 9 सकाळी साडेदहा वाजता सभा झाली आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात भाजपा -शिवसेना -राष्ट्रवादी –
आरपीआय मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत..
ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारात अजित पवार यांची लोणी काळभोर येथील खोकलाई चौकात शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सभा घेतली आहे. या सभेत अजित पवार पुणे सोलापूर, पुणे नगर मार्गाची दुरवस्था व वाहतूक कोंडी, रिंग रोड उड्डाणपूल घोडगंगा व यशवंत सहकारी साखर कारखाना नागरिकांच्या समस्या व विकासाच्या बाबतीत काय बोलणार त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते..
दरम्यान,शिरूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (आबा )कटके व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यात होणार आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथील सभेत अजित पवार आपली भूमिका मांडली..
पत्रकार शरद जाधव
9011637272..
Discussion about this post