*अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्याकरिता अकोला पोलिस दलातर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई सुरू आहे. आजपर्यंत पोलिस स्टेशन स्तरावर अवैध दारूसंबंधी विशेष मोहीम राबवून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकूण ३९६ कारवाया करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post