– खासदार श्रीरंग बारणे यांचे खामसवाडी येथे आवाहन
खामसवाडी – शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे हे गरीब माणूस आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांद्वारे विकासात्मक कामे करणारे आणि जनतेच्या कामांत नेहमी तत्पर असणारे नेते आहेत. त्यांना निवडून देण्याचे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी खामसवाडी येथे आयोजित सभेत केले.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील गरीब आणि शेतकरी वर्गाला विविध योजनांचा लाभ मिळेल.त्यांनी नेहमीच समाजाच्या तळागाळातील घटकांच्या हितासाठी काम केले आहे.” त्यांनी पिंगळे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना असेही नमूद केले की, “विकासाच्या मुख्य प्रवाहात या घटकांना सहभागी करून घेणे ही महायुतीची प्राथमिकता आहे.”
“शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान आणि सर्वांगीण विकासाची ग्वाही”
श्रीरंग बारणे यांनी पुढे सांगितले की, “महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध सवलती, आर्थिक मदत आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न होणार आहेत. अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली या कामांना गती मिळेल.”
खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित जनतेला आवाहन केले की, अजित पिंगळे यांना निवडून देऊन गावाच्या आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्थन द्यावे.
महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना थेट आवाहन करत, “तुमच्या गावासह संपूर्ण मतदार संघाच्या विकासासाठी मला निवडून द्या,” असे सांगितले आहे. “मी एक सर्वसामान्य आणि निष्ठावंत माणूस आहे, आणि आपल्या मतदार संघाचा विकास आणि प्रगती घडवण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे पिंगळे यांनी स्पष्ट केले.
अजित पिंगळे यांनी मतदारांशी संवाद साधताना आपल्या योजना आणि उद्दिष्टे याबाबत माहिती दिली. “महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही प्रामाणिकपणे विकासाची नवी दिशा आणू. आपल्या गावातील पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत,” असे ते म्हणाले.
“सर्वांच्या सहकार्याने विकास साध्य करू”
अजित पिंगळे यांनी पुढे सांगितले की, “सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना न्याय देणे हे माझे कर्तव्य असेल. मी निवडून आलो तर पारदर्शक व प्रगतीशील प्रशासनाची हमी देतो.”सर्व मतदारांना आवाहन केले की, त्यांच्या मतांच्या माध्यमातून गावाच्या आणि संपूर्ण मतदार संघाच्या विकासात योगदान द्याव.
Discussion about this post