संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
शिरूर : विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. डी .एन. ताठे माध्यमिक विद्यालय ,कारेगाव ता.शिरूर जि.पुणे या विद्यालयात बुधवार, दिनांक १३/११/२०२४ रोजी विद्यार्थिनींसाठी समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत समुपदेशनासाठी जीवनविद्या मिशन केंद्र शिरूरच्या संचालिका ,सौ .संगीताताई पाटील मॅडम सौ.ललिताताई कर्डिले मॅडम , सौ.ज्योतीताई लांडे मॅडम आणि सौ .सारिकाताई लांडे मॅडम यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
सौ. पाटील मॅडम यांनी मुलींना वयात येताना होणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे ? हे अत्यंत शास्त्रीय दृष्ट्या समजून सांगितले. सौ.कर्डिले मॅडम यांनी मुलींना व्यायाम कराटेचे महत्व पटवून दिले .त्यामुळे मुली स्वतःच स्वतःचे संरक्षण करू शकतात . सौ. ज्योती लांडे मॅडम यांनी प्रसार माध्यमांचा अतिरेक विशेषत: मोबाईलचा योग्य वापर कसा करावा ? यावर प्रकाश टाकला. टीव्ही सिरीयल्स व सोशल मीडिया कसा
भूलभुलैया आहेत. ती एक आभासी दुनिया आहे , हे मुलींना समजावून सांगताना वास्तवात जगण्याचा सल्ला दिला. सौ .सारिकाताई लांडे मॅडम यांनी मुलींना आहार ,विहार ,वाचन व सकारात्मक विचारांच्या सहाय्याने कशाप्रकारे सक्षम बनू शकता? हे अगदी मिश्किल भाषेत पटवून दिले.
सर्व मुलींनी उत्तम प्रतिसाद दिला. कु. अनुष्का पठारे, श्रावणी कोहोकडे ,समीक्षा भूरूक, शिवानी खेडेकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून स्वावलंबी सशक्त बनू असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ,श्रीमती. विमल झावरे मॅडम यांनी भूषवले. सूत्रसंचालन ,श्रीमती. निकिता जाधव मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती .धनश्री करपे – सरोदे यांनी केले ,तर नियोजन श्रीमती. इंगोले मॅडम यांनी केले .श्रीमती कविता धावडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
श्री .डी .एन .ताठे माध्यमिक विद्यालय कारेगाव हे विद्यालय औद्योगिक क्षेत्रात असल्याने चांगल्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या संस्कार व सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाते.
Discussion about this post