अकलूज येथील “चांदतारा” मस्जिद चे युवा जिम्मेदार सैफअली रफिकभाई बागवान यांची महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी च्या माळशिरस तालुका “सहसंघटक” पदी निवड झाल्याचे पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांच्या आदेशाने संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य जुबेरभाई बागवान (बार्शी) यांच्या हस्ते अकलूज येथे देण्यात आले…
अकलूज येथे एका लग्न समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे येथे येणे झाले होते,यातच महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची एक मीटिंग अकलूज मध्ये पार पडली,या वेळी संघटनेच्या ध्येय धोरणांची सर्व माहिती संघटनेचे ज्येष्ठ असणारे जे के बागवान (सोलापूर) यांनी दिली…

या वेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आसिफभाई बागवान,बार्शीचे कदीरभाई बागवान,वैरागचे रईसभाई बागवान,माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष मुक्तार बागवान,संघटक ताहेरभाई मोहोळकर,उपाध्यक्ष फरीद बागवान यांच्या सह बहुसंख्य बागवान समाज बांधव उपस्थित होते…सदर मीटिंग चे सुत्र संचालन संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आमीर मोहोळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सैफअली बागवान यांनी मानले…
Discussion about this post