निलंगा/प्रतिनिधी:निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणारे माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडीच्या निलंगा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यात तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांचाही समावेश आहे. युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पटेल,संगायो समितीअध्यक्ष शेषेराव ममाळे,भाजपा शहराध्यक्ष अँड वीरभद्र स्वामी,तालुकाध्यक्ष इरफान सय्यद, प्रकाश पटणे, सुमित इनानी,अविराज पाटील यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्यासह उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शहराध्यक्ष दिनेश शिंदे,शहर उपाध्यक्ष उमेश कोरे,शहर सचिव बंटी सोनकांबळे,उपाध्यक्ष देवानंद कटके,महिला तालुकाध्यक्षा वंदनाताई सूर्यवंशी,मंगलाताई सूर्यवंशी, नितीन सुरवसे,अस्लम सिराज मुल्ला,सावित्रीबाई सूर्यवंशी, पल्लवी कांबळे,संगीता सूर्यवंशी, महंमद शेख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
Discussion about this post