निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये 85 वर्षाहून अधिक वय आणि 40% हून अधिक दिव्यांना असलेल्या घरातून मतदान करण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलता दिली. त्या म्हणाल्या या विधानसभा निवडणुकीदरम्यान मिरज विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ 375 ज्येष्ठांसह दिव्यांग मतदारांनी घरबसल्या मतदानासाठी मिरज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यापैकी 358 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये 40% हून अधिक दिव्यांग असलेल्या 45 दिव्यांगांचा समावेश आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात 85 हुन अधिक वय असलेले जवळजवळ 4675 मतदार आहेत. 40 टक्क्याहून अधिक दिव्यांग असलेले 1718 दिव्यांग मतदार आहेत. घरात बसून मतदानासाठी निव्वळ 775 मतदारांनी अर्ज केला होता. 85 हुन अधिक वय असलेल्या जेष्ठ आणि 40टक्क्याहून अधिक दिव्यांग असलेल्या 45 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पुढे म्हणाल्या मतदानाची ही प्रक्रिया दोन दिवस सुरू होती चार मतदार अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांचे गृह मतदान होऊ शकले नाही. तर तीन मतदारांनी मतदान करण्यासच नकार दिला. गृह मतदानासाठी अर्ज केलेल्यांपैकी 10 मतदार हे मृत झाल्यामुळे त्यांनी केलेले अर्ज रद्द झाले. मिरज मतदार संघात गृह मतदानासाठी 375 पैकी 358 मतदारांनी गृह मतदानाचा लाभ घेतला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मिरजच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांच्या पथकांकडून ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
Discussion about this post