गेल्या पंचवार्षिक पहिली दोन आडीच वर्षे विरोधी सरकार आणि कोरोनाचा काळ होता आणि राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे फडणवीस पवार सरकार आले आणि या सरकारने श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाला कोट्यावधीचा निधी दिला आणि श्रीगोंदा नगर तालुक्यात ८००किमी रस्त्यांचे नेटवर्क तयार करण्यात आले पाणी विजेचे प्रश्न सोडविला आहे अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी लोकमतशी बोलताना दिली पाचपुते पुढे म्हणाले की रस्त्यांची कामे करताना पुर्व पश्चिम दिशाच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ५५० किमी जिल्हा मार्गाचे राज्य मार्गात रुपांतर करण्यात १०० किमी रस्त्यांचे ग्रामीण मार्गाचे जिल्हा मार्गात रुपांतर करण्यात आले श्रीगोंदा शहर केंद्र बिंदु मानुन शहराला जोडणारे रस्ते करण्यात आले यामध्ये वेळू ते लिंपणगाव भानगाव ते घारगाव लोणीव्यंकनाथ ते गणेशनगर मार्गे श्रीगोंदा श्रीगोंदा ते बाबुर्डी, श्रीगोंदा ते चांडगाव श्रीगोंदा ते टाकळी, चिंचोडी पाटील गुणवडी त्या गावाला सर्व रस्ते तांदळी गुंडेगाव ते कोळगाव गुणवडी परिसरातील रस्ते करण्यात आले मांडवगण ते रुइखेल नगर तालुक्यातील काही गावांची बीड जिल्ह्य़ाशी रस्स्यांनी कनेक्टिव्हिटी वाढविली आहे नगर दौड जामखेड ते शिक्रापूर हे राष्ट्रीय महामार्ग झाले आता शिरुर बेलवंडी श्रीगोंदा काँक्रिटीकरण मांडवगण ते श्रीगोंदा श्रीगोंदा ते पेडगाव श्रीगोंदा ते कोळगाव निमगाव ते अजनुज ३५कोटी काष्टी ते पेडगाव काष्टी ते वांगदरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार आहे कुकडी घोड कालवा मुख्य वितरिका विस्तारीकरण लाईनिंग साठी सुमारे २०० कोटीचा निधी मंजुर झाला आहे तसेच मतदार संघात ६० केटीवेअर बंधारे तयार झाले आहेत. विजेचे सन १९८० ला एकच ३३/११ केव्ही चे एकच सब स्टेशन होते जवळपास ५० सबस्टेशन झाली आहेत.
श्रीगोंदा शहराशी कनेक्टिव्हिट श्रीगोंदा शहराला आता दहा कोटीची कामे मंजुर करून घेतली आहेत या मध्ये शहीद भवन सह सर्व जाती धर्मातील प्रार्थना स्थळांना महत्व दिले आहे. एकहजार सौर लॅब बसविण्याचे काम सुरु आहे दहा ठिकाणी ओपन जीम बसविण्यात येणार आहे. मांडवगण रोडवर दहा एकर जागेत जिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. त्यासाठी १० कोटी मंजुर करुन घेतले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे याच्याकडेपाठपुरावा करून विक्रम पाचपुते यांनी बेलवंडी परिसरात शेती महामंडळाच्या जमीनीवर ५५० जागेत एमआयडीसी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे या ठिकाणी एक दीड वर्षात एमआयडीसी उभे करण्यास सुरुवात होईल.
विक्रमसिंहचा पाठपुरावा मी आजारी होतो कारखान्याच्या आडचणी निर्माण झाल्या अशा परिस्थितीत विक्रमसिंह व प्रतापसिंह यांनी हिम्मत सोडली नाही. माझा मंत्रालयाशी कमी संपर्क आला पण सुचविलेली आणि त्याने डोक लावून आणखी कामे माझ्या लेटर पॅडचा वापर करुन मंजुर करुन आणली त्यामुळे आज हे चित्र बदलताना दिसत आहे. असेही सारथी महाराष्ट्राशी बोलताना आमदार श्री.बबनराव पाचपुते म्हणाले .
Discussion about this post