मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी युवा डॉक्टर शिवकार्तिक स्वामी यांचा स्तुत्य उपक्रम#*देगलूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीमध्ये देगलूर विधाससभा मतदार संघात मतदानाचे प्रमाण ७५ टक्के व्हावे , यासाठी स्वीप कक्षाद्वारे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.विशेष महत्वाची बाब म्हणजे देगलूर शहरातील सावित्रीबाई फुले हायस्कूल मध्ये एकूण तीन मतदान केंद्र आहेत व हायस्कूलच्या अगदी समोर डॉ. शिवकार्तिक शिवानंदस्वामी यांचे शिव आयुर क्लिनिक आहे.
त्यामूळे डॉ. स्वामी यांना मतदार जनजागृतीच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे आवाहन तहसील कार्यालयातील स्वीप कक्षाच्या वतीने करण्यात आले व त्याला प्रतिसाद देत डॉ. स्वामी यांनी दि.२० नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन सहयोग द्यावा असे आवाहन केले व जे मतदार मतदान करून मतदान केल्याची शाई बोटाला दाखवतील त्यांना दि. २० व २१ नोव्हेंबर असे दोन दिवस बी.पी व आरोग्य तपासणी फीसमध्ये १०० % सूट देण्यात येईल असे जाहीर केले आहे.
लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदानाचे प्रमाण / टक्केवारीत वाढ होणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी समाजातील डॉक्टर,वकील,पत्रकार,प्राध्यापक व इतर सर्व घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील इतर व्यापारी,उद्योगपती,वकील,डॉक्टर यांनीही डॉ. शिवकार्तिक शिवानंद स्वामी यांची प्रेरणा घेऊन मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन स्वीप कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post