ठाकूर पिंपरी गावच्या ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात बाबाजी काळे यांचे स्वागत केले. दरम्यान वारकरी संप्रदायाचा पगडा असलेल्या बाबाजी काळेंना वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
. जिल्हा परिषद सदस्य असताना काळे यांनी मोठ्या प्रमाणात भजनी मंडळ आणि वारकऱ्यांनी मदत केल्याने अनेक वारकरी काळे यांच्या बद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर बोरदारा येथील ग्रामस्थांनी देखील टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत केले तर वराळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत बाबाजी काळे यांना पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी शेलू ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बाबाजी काळे यांच्या पाठीमागे उभे असल्याची ग्वाही दिली. संपूर्ण मतदारसंघात बाबाजी काळे यांना मानणारा कार्यकर्ता, शिवसैनिक प्रचारात सहभागी होत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय डोळस व्यक्त केले. यावेळी प्रचार दौऱ्यात हिरामण सरकार, वंदना सातपुते, विजया शिंदे, मनीषा सांडभोर, श्रध्दा सांडभोर, नीता आल्हाट, सुभाष मांडेकर, संतोष राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post