सावनेर प्रतिनिधी – सूर्यकांत तळखंडे..
नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सावनेर – कळमेश्वर विधानसभा क्षेत्र 1994 पासून माजी मंत्री सुनील केदार यांचा गड आहे. ते फक्त या क्षेत्रातून एकदाच निवडणूक हरले आहे परंतु त्या नंतर सुनील केदार हे सतत कांग्रेस पक्षाकडून निवडणूक लढत आहे.
आणी विजयी पण झाले या वेळेस सुनील केदार ऐवजी त्यांच्या पत्नी अनुजा केदार या रणागनात आहेत. तर भाजपा कडून डॉ आशिष देशमुख लढत आहे. डॉ आशिष देशमुख हे माजी मंत्री रंजीत देशमुख यांचे सुपुत्र आहेत.
या अगोदर 2009 ला माजी मंत्री सुनील केदार यांनी आशिष देशमुख यांचा पराभव केलेला होता. त्या नंतर 2014 ला काटोल नरखेड मधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचा पराभव करून डॉ आशिष देशमुख आमदार झाले. परंतु अवघ्या अडीच वर्षात राजीनामा दिला त्यानंतर 2014 ला आशिष देशमुख यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश करून उपमुख्यामंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण मधून निवडणूक लढले.
तिथे डॉ आशिष देशमुख यांचा पराभव झाला. आत्ता सद्या पुन्हा भाजपा मध्ये जाऊन माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचे विरोधी उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे. दोन्ही उमेदवार प्रचाराला चिकाटीने भिडले असल्यामुळे विजय कुणाचा होईल या बाबत अजून प्रश्नचिन्ह आहे सुनील केदार यांच्या गडात खिंडार पडेल काय..? की आशिष देशमुख यांचा पुन्हा पराभव होईल ? अटीटटीचा सामना असल्यामुळे जनतेचा कौल कुणाकळे वळेल हे मात्र मतमोजणीच्या च्या दिवशीच कळेल..
Discussion about this post