श्रीगोंदा: (तालुका प्रतिनिधी )२४ नोव्हेंबर
२२६ श्रीगोंदा/नगर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत श्री.विक्रम बबनराव पाचपुते (भारतीय जनता पार्टी) हे विक्रमी ३७१५६ मतांनी विजयी होत प्रचंड बहुमत मिळवले. निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी काल स्थानिक प्रशासनामार्फत शांततेत पार पडली.
यावेळी विजयी उमेदवार श्री. विक्रम पाचपुते यांनी सारथी महाराष्ट्राशी बोलतांना सांगितले ह्या निवडणुकीत आदरणीय दादांनी केलेल्या विकास कामाची पावती म्हणुन मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मतांनी विजयी केलं. आणि यापुढे मी तालुक्यातील उर्वरित विकास कामासाठी कटीबद्ध राहील. तसेच आम श्रीगोंदा तालुक्यातील जनतेसाठी मी… दादा… प्रताप भैय्या आणि माझी आई 365 दिवस 24 तास उपलब्ध राहु.
नवनिर्वाचित आमदार श्री. विक्रम बबनराव पाचपुते यांचे अभिनंदन तळागाळातील जनतेकडुन होत आहे.
काल निकालची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख पोलीस बंदोबस्तात पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे व पोलीस यंत्रनेचे आभार विजयी आमदार श्री.विक्रम पाचपुते यांनी मानले.
Discussion about this post