सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी महायुतीचे सगळ्या उमेदवारांनी विजय मिळवल्यामुळे राष्ट्रवादीने आपला बलेकिल्ला गमवला आहे. वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांनी बाजी मारली तर सातारा-जावली मतदासंघातुन भाजपचे मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माहाराष्ट्रामध्ये तब्बल एक लाख बेचाळीस हजार मतानीं विजयी झाले, तर कोरेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे विजयी, माण-खटाव मतदारसंघातून भाजपचे जयकुमार गोरे विजयी, पाटण मतदारसंघातून शंभुराज देसाई विजयी, दक्षिण आणि उत्तर कराडमधुण अतुल भोसले आणि मनोज घोरपडे विजयी, फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातील सचिन पाटील विजयी झाले. या आठ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याचा फायदा महायुतिला झाला, तसेच महाराष्ट्रातील राबवलेली लाडकी बहिण योजना याचा फायदा मोठ्या प्रमाणात मतदान मिळवण्यासाठी झाला. शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी राजेनां मंत्रीपद मिळावे अशी मागणी केली आहे
Discussion about this post