नांदुर मध्यमेश्वर ते इकडे वस्ती जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ये जा करण्यासाठी स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना मोठ्या कसोटीचा सामना करावा लागतो. एकूण दोन अडीच किलोमीटरचा हा रस्ता आहे या रस्त्यावर जवळपास ६० ते ७० वस्त्या आहेत. या भागातील जवळपास ५० ते ६० शालेय विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात सध्या परिसरामध्ये पाऊस सुरू असल्याने रस्ता अतिशय खराब झाला आहे. पायी जाणे येणे सुद्धा कठीण बनले आहे. या भागात मोठे शेती क्षेत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल सुद्धा ने-आण करावा लागतो. तसेच शेती पंप चालू करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते या भागात हिंस्र प्राणी पण आढळून येतात त्यामुळे शेतकरी वर्गाच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी नांदुर मध्यमेश्वर ग्रामपंचायतकडे यासंदर्भात वेळोवेळी तक्रार केली रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली आहे. परंतु ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारे तक्रारीची दखल घेतली नाही अशी स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. श्रीकांत इकडे . दत्तु शेळके.नितिन सोनवणे.सदीप इकडे अझहर पठाण. सोपान गचाले.गणेश शिंदे. किरण ठाकरे सुमित शेळके. किरण शिंदे डांगले . जाधव, राहुल ठाकरे .आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष निफाड
अति महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या संदर्भात ग्रामपंचायतला निवेदन देण्यात येणार आहे तसेच या ग्रामस्थांनी रस्त्याच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जर लवकरात लवकर रस्ता दुरुस्त झाला नाही तर आम्ही ग्रामपंचायत वर आंदोलन करू मग काय ते ग्रामपंचायत पाहून घेईल असे सांगण्यात आले
Discussion about this post