गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
फुलसावंगी येथील 109 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना घडली. लोकशाहीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आई आपल्या केवळ तीन महिन्याच्या लेकरासह मतदान केंद्रावर हजर झाली.
तीन महिन्याच्या बाळाला घेऊन आलेली ही आई महिलांसाठी आणि सर्वसामान्य मतदारांसाठी आदर्श ठरली. तिने मताचा हक्क बजावण्यासाठी असलेली जबाबदारी आणि समर्पण दाखवून दिले. एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी असलेली तयारी पाहून उपस्थित कर्मचारी आणि मतदार भारावून गेले.
या आईने मतदारांना संदेश दिला की, प्रत्येक मत मूल्यवान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मतदान करणे आपले कर्तव्य आहे. अशा समर्पित मतदारांच्या प्रयत्नांमुळेच लोकशाही मजबूत होते.
फुलसावंगीतील या घटनेने मतदानासाठी जनजागृतीचे उदाहरण उभे केले असून, तिच्या या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post