
झरी तालुक्यातील छोट्याश्या वेडद येथे 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.संस्कृती परंपरा जपण्यासाठी हा दिवस तिथे दरवर्षी साजरा केला जातो.
तो दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष:- प्रणय काळे ,उपाध्यक्ष:- विनोद कोरवते,आणि तसेच वेडद गावचे (सरपंच) श्री.साईनाथ भाऊ माणुसमारे (उपसरपंच) श्री.हरिभाऊ सुरपाम, आणि (तंटामुक्ती अध्यक्ष) श्री.प्रदीप पा.निखाडे,आणि सर्व वेडद गावचे ग्रामस्थ आणि सर्व आदर्श नवयुवक मित्रपरिवार ,बालगोपाल,आणि क्रांतिसूर्य बिरसा मुंडा बहुुद्देशिय संस्था वेडद चे अध्यक्ष आणि सर्व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.
येथील नवयुवकांनी स्पष्ट सांगितले की हा जागतिक आदिवासी दिवस आदिवासी बांधवांचाच नसून आम्हा सर्वांचाच आहे.कारण जात धर्म या गोष्टीला आम्ही मानत नसून,या जगात एकच धर्म आणि एकच जात आहे.ती म्हणजे मानवता हा आमचा धर्म आहे.माणुसकी ही आमची जात आहे .हा सर्वात मोठा संदेश आदर्श नवयुवक मित्रपरिवार वेडद यांनी लोकांना दिला.
Discussion about this post