निशाणपुरा वॉर्डात तणावपूर्ण वातावरण : चार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हिंगणघाट : भाजपचे विद्यमान आमदारसमीर कुणावार हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने २३ रोजी शहरातून विजयी रॅली काढण्यात आली होती. मात्र, रॅलीत सहभागी काहींवर निशाणपुरा येथील टिपू सुलतान चौकात काहींनी दगडफेक केल्याने रॅलीत सहभागी एका महिलेसह पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर निशाणपुरा वॉर्ड परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शाहरुख खान युसूफ खान (२१), हसीमशहा हुसेन शहा (२६), अयान खान सलीम खान (२१), फैजान खान करीम खान (२७), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे, तर या दगडफेकीत वैभव रमेश हिवंज, अमित पिंपळकर, अक्षय उंबरकर, कुंदण खडसे, माया मसराम या जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.भाजपचे उमेदवार समीर कुणावार हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली होती. निशाणपुरा वॉर्डातील टिपू सुलतान चौकात विजयी मिरवणूक वाजतगाजत पोहोचली असताना परिसरातील काही
समाजकंटकांनी रॅलीतील लोकांना उद्देशून समोर जा, असे म्हटले. त्यानंतर रॅली पुढे गेल्यावर अचानक मिरवणुकीवर दगड भिरकविण्यात आले. जखमी वैभव हिवंज याने दगडफेक कोण करत आहे, हे पाहिले असता इम्रान, शोएब ऊर्फबुटरी, हासीम, भुऱ्या शाहरुख, वसीम व इतरांच्या हातात दगड असलेले दिसून आले.दगडफेकीत वैभवच्या हाताला व खांद्याला, अमित पिंपळकर याच्या डोक्यावर, अक्षय उंबरकर याच्या’एसपी’ होते तळ ठोकून■ शहरात घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपवि- भागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण परिसराची पाहणी केली, तसेच दोन्ही बाजू शांत करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस अधीक्षक पोलिस ठाण्यातच तळ ठोकून बसले होते.मध्यरात्रीपर्यंत पोलिस ‘सायरन’चाच आवाजघटनेनंतर दोन गटांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिणामी पोलिसांची अतिरिक्त कुमक निशाणपुरा वॉर्डात पाचारण करण्यात आली होती. पोलिसांकडून गस्त घातली जात होती. २४ रोजी देखील शहरात दंगल नियंत्रक पथक, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस, सीआरपीएफ, एसआरपीएफसह इतर NH46 AP जवानांच्या चमू तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिस वाहनांतून सायरन वाजवत गस्त घातली जात होती. मध्यरात्री उशिरापर्यंत या परिसरात केवळ पोलिस सायरनचाच आवाज सुरू होता.डोळ्यावर व कपाळावर, कुंदन खडसे याच्या नाकावर, मांडीजवळ दुखापत झाली, तसेच रॅली पाहत असलेल्या माया मसराम यांच्या पायाला दुखापत झाली. वैभवच्या तक्रारीवरून, तसेच वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनीआरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (२), १९०, १९१ (२), ११८ (१), ११८ (२) अन्वये गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम करत आहेत.

Discussion about this post