आदर्श विद्यार्जन मंडळाचे अध्यक्ष ग्यानोबाराव वाठोरे अनंतात विलीन.
तालुका प्रतिनिधी: चंद्रकांत भोरे
दि. हदगांव (नांदेड)
हदगांव तालूक्यातील हरडफ येथील जेष्ठ,नागरिक सामाजीक कार्यकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून दिवंगत माजी खासदार हरिहरराव सोनुले यांनी स्थापन केलेल्या आदर्श विद्यार्जन मंडळ द्वारा संचलित पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष ग्यानोबाराव विठ्ठलराव वाठोरे आबा यांचे १०२ व्या वर्षी वर्धापकाळाने दुःखद निधन झाले.शांत,संयमी आणि प्रेमळ स्वभावाचे वाठोरे काका सर्वत्र आबा म्हणून परिचीत होते.
१९५६ च्या नागपूर येथील डॉ.बाबासाहेबांच्या धर्मात्तर सोहळ्याला उपस्थित राहाण्याचे भाग्य त्यांना लाभले ते या सोहळ्याचे साक्षीदार होते.
बु.माजी खासदार हरिहरराव सोनूले यांच्या निवडणूकीच्या काळात घरची भाकर खावून सायकल वर गावोगाव फिरत त्यांनी हरिहररावांचा प्रचार केला होता.
हरडफ या त्याच्या गावात सर्व समाज एकोप्याने राहावा या साठी ते नेहमी प्रयत्नशील असत आणि गावात सर्व समाजतील लोक त्यांच्या शब्दा बाहेर जात नसत.
नुकताच त्यांचा शतकपुर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला होता आदर्श विद्यार्जन मंडळाचे सचिव सुनीलभाऊ सोनुले यांनी त्यांची पुस्तक तुला केली होती.
आदर्श विद्यार्जन मंडळाच्या पंचशील प्राथ,माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुठलाही कर्मचारी निवृत्त होत असताना वाठोरे काकाचे डोळे भरून यायचे संस्थेच्या अध्यक्षाचे डोळे भरुण येणे असे महाराष्ट्रातील एकमेव या शाळेत पाहायला मिळात होते.आज त्यांच्या गावी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी सदस्य सुनिल सोनूले, शिक्षक आमदार विक्रम काळे,यांचे शोकसंदेश वाचून दाखण्यात आले.
या प्रसंगी कॉग्रेसचे शहराध्यक्ष खदिरखान,प्रदेश काँग्रेसच्या सदस्या डॉ.रेखा चव्हाण,भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते दादासाहेब शेळके,शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते पांडूरंग कदम,वंचित बहूजन आघाडीचे तालूकाध्यक्ष देवानंद पाईकराव,रिपाई आठवले पक्षाचे तालूकाध्यक्ष रमेश नरवाडे,
शास्त्रज्ञ भास्कर दवणे,डॉ. नरवाडे,आदर्श विद्यार्जन मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमूद हदगावकर मॅडम,शिवाजीराव तावडे,
वि.मा.टाले,जगदिश कदम,सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार सह हदगाव हरडफ परिसरातील हाजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
Discussion about this post