आपल्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीचा नंबर हा ओळखता यावा असा असावा अशी सर्वांची इच्छा असते त्यात आवडत्या नंबर साठी हजारो रुपयेही मोजले जातात. मात्र त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आर टी ओ कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणे हे नेहमीचे आहे मात्र आता आर टी ओ कार्यालयाने कात टाकत हम भी किसी से कामं नही हे दाखवून दिले आहे. आता फॅन्सी नंबर साठी या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले. ते म्हणाले कि आमच्या विभागाची फेसलेस सेवा आम्ही नागरिकांच्या सोयीसाठी सुरु करत आहोत. आता घरबसल्या ऑनलाईन फॅन्सी नंबर दुचाकी किंवा चारचाकी वाहन धारक घेऊ शकतात. यापूर्वीआमच्या संकेतस्थळावर आपल्या आवडीचा नंबर आरक्षित करून पैसे भरण्यासाठी आमच्या कार्यालयात यावे लागत होते आता तसे होणार नाही घरातूनच ऑनलाईन हा नंबर वाहनधारक मिळवू शकतो. संपूर्ण राज्यामध्ये २५ नोव्हेंबर पासून हि सुविधा सुरु झाली आहे. यासाठी वाहनधारक fancy.parivahan मोबाईल आणि ईमेल च्या माध्यमातून ओटीपी प्राप्त करू शकतात. नंतर नोंदणी करून आपल्या आवडीचा नंबर आरक्षित करून ऑनलाईन पेमेंट भरून पावती मिळवा ती पावती गाडी विक्रेत्यांना दाखवा बस इतकेच काम आहे. या मुळे कमिशन एजंट ना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
Discussion about this post